माझा भाऊ सत्य बोलतो, तो कोणालाही घाबरणार नाही…वायनाडमधून प्रियंका गांधींची टीका


दैनिक स्थैर्य । दि. ११ एप्रिल २०२३ । मुंबई । लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडला पोहोचले. 2019 मध्ये राहुल याच जागेवरुन लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. राहुल आणि प्रियांका दोघेही रोड शोमध्ये सहभागी झाले. या रोड शोमध्ये त्यांचे शेकडो समर्थक पोहोचले होते. रोड शोपूर्वी प्रियंका गांधी यांनी केंद्रावर जोरदार टीका केली.

राहुल तुमच्या पाठीशी उभा आहे…
त्या म्हणाल्या की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींना वाचवण्यात गुंतले आहेत. मोदी रोज आपली ड्रेसिंग स्टाईल बदलतात, पण सर्वसामान्यांच्या जीवनशैलीशी त्यांना काही देणं-घेणं नाही. तुम्हाला माहित आहे की, राहुल सत्य बोलणारा व्यक्ती आहे. तो कोणालाही घाबरत नाही. सत्ताधारी त्याला हटवू पाहत आहे, पण तो त्याच्या जागी ठाम आहे. तो तुमचा संघर्ष समजून घेतो, तुमच्यासाठी काम करतो, तुमच्या पाठीशी उभा असतो.’


Back to top button
Don`t copy text!