दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । लातूर । दिनांक २६/०९/२०२२ सोमवार रोजी सायंकाळी ०९-३० वाजता लातूर येथील मणीयार डेव्हलपर्स या कार्यीलयात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अँड प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकरणी सदस्यपदी मा.अमोल लांडगे यांची निवड केली तसेच औरंगाबाद ,बीड , उस्मानाबाद जिल्हा पक्ष निरक्षक पदी नियुक्ती हि सोपविण्यात आली वंचित बहुजन आघाडी पक्षाचे धोरण सामान्य माणसाच्या हितासाठी व पक्ष वाढीसाठी कार्य करावे या उद्देशाने निवड करण्यात आली या महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकरणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी सत्कारास उत्तर देतांना मा. अमोल लांडगे म्हणाले की मुस्लिम आरक्षण हा मुद्दा पक्षाच्या अजेंड्यावर असुन आम्ही महाराष्ट्र भर यासाठी आंदोलन उभारणार आहोत वेळप्रसंगी लोकशाही मार्गाने आंदोलनात्मक भुमिका घेऊन झोपलेल्या शासनाला जागे करु असे मत मांडले यावेळी त्यांनी अँड प्रकाशजी आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची केली त्या विषयी म्हणाले की पक्ष स्थापना २० मे २०१८ स्थापना केली २४ मार्च २०१९ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत ‘राजकीय पक्ष’ म्हणून मान्यता दिली, यात भारिप बहुजन महासंघ पक्ष विलीन झाले वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन २८ सप्टेंबर २०१८ रोजी सोलापुरात झाले वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न केला जिल्ह्या-जिल्ह्यात सत्ता संपादन मेळावे घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.२३ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कवर सभा घेण्यात आली व १४ मार्च २०१९ रोजी, अँड प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. पक्षाचे ध्येय ,धोरण हे सकारात्मक विचार घेऊन कार्य करत आहोत त्या मध्ये मानवाच्या जिवनाच्या अस्तित्वाची लढाई शासन विरुद्ध लढत आहोत तेव्हा आपण हि सहभागी व्हावे व अँड प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराची चळवळ उभी करावी असे मनोगत व्यक्त केले यावेळी मुफ्ती अब्दुल गणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच हाफे़ज मुजाहेद साहेब हाफे़ज रहेमतुल्लाह साहेब , मा.खदीर मणीयार जेष्ठ समाजसेवक अब्दुल समद शेख संपादक युवा मुस्लिम विकास परिषद मा. रशिदभाई शेख , हबीब पठाण , फेरोजखान पठाण , सद्दाम पठाण , अमजत पठाण , वसीमभाई पानवाले , सह मान्यवर उपस्थित होते राज्य सदस्य निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे