
स्थैर्य, सातारा, दि. 15 डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दीची सांगता 14 डिसेंबर रोजी होत आहे . यानिमित्त दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व विजय साबळे यांच्या संयुक्त विद्यमाने राज कपूरयांना संगीतमय आदरांजली पाहण्यात आली.
हिट्स ऑफ राज कपूर या कार्यक्रमाअंतर्गत विविध कलाकारांनी राज कपूर यांच्यावर चित्रित झालेली किंवा त्यांच्या चित्रपटातील विविध गाणी सादर करून या महान कलाकाराबाबत आपला आदर व्यक्त केला कार्यक्रमाची संकल्पना विजय साबळे यांची होती.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार निकम, रवींद्र खंदारे, श्रीराम नानल, सुरेखा शेजवळ, मुकुंद फडके, ऋषिकेश भिलारे, शिरीष चिटणीस उपस्थित होते यावेळी सुरेखा शेजवळ यांनी राज कपूर यांच्या काही आठवणी सांगितल्या. राज कपूर आणि मुकेश यांच्यातील अतुट संबंध त्यांनी अधोरेखित केले. इतर वक्त्यांनीही यावेळी राजकपूर याना आदरांजली वाहिली.
हा कार्यक्रम खर्या अर्थाने विजय साबळेसोबत सचिन शेरकर,मिलिंद हर्षे,शिरीष चिटणीस,मंजुषा पोतनीस ,स्मिता शेरकर,गीतांजली जगदाळे आणि ममता नरहरी यांनी सादर केला.
सजन रे झुट मत बोलो,मेरा जूता है जपानी,किसी की मुस्कुराहतो पे , कहता है जोकर,दोस्त दोस्त ना रहा या गाण्यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले
मंजुषा पोतनीस मॅडम, स्मिता शेरकर आणि ममता नरहरी यांची युगल गीते खूप छान झाली. त्याचबरोबर कार्यक्रमाला एक वेगळी उंची मंजुषा पोतनीस मॅडम यांच्या सत्यम शिवम सुंदरम,आणि एक राधा एक मीरा या दोन्ही गाण्यांनी आली.

