कुसवडे येथून मुरूम चोरीला


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | कुसवडे (ता.सातारा) येथील शिवारातून अज्ञाताने मुरूम चोरून नेल्याची फिर्याद विजय गणपत पवार यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल।केली आहे.विजय पवार हे दि.२४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे असताना कुसवडे येथील त्यांच्या मालकीच्या गट नं.२०६ मधील दोन गुंठे क्षेत्रातील सुमारे १० हजार रुपये किमतीचा मुरूम अज्ञाताने जेसीबीच्या साहाय्याने चोरून नेला.यासंदर्भात सातारा तहसीलदार यांची नोटीस विजय पवार यांना आल्यानंतर त्यानी गावी येऊन पहाणी केली.याची फिर्याद त्यांनी गुरुवारी बोरगाव पोलिसांत दिली असून पुढील तपास हवालदार राजू शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!