
स्थैर्य, सातारा, दि. ०६ : दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, वृत्तपत्र सृष्टीतील आदरणीय मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे आज निधन झाले, अनेकांचे आधारस्तंभ असलेल्या बाबांचे अनपेक्षित निघून जाणे, फारच वेदनादायी आहे. महाराष्ट्रातील असंख्य तरुणांचे वृत्तपत्र व्यवसायाच्या माध्यमातून संसार उभे करण्यात बाबांचे मोठे योगदान आहे. वृत्तपत्र विक्रेता ते महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाच्या वृत्तपत्र समुहाचे मालक असा त्यांचा प्रवास मराठी माणसाला प्रेरणादायी आहे.