
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी कन्यांनी फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथे मुरघास बनवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. हे प्रात्यक्षिक श्री. निलेश तानाजी तावरे यांच्या शेतावर घेण्यात आले असून यावेळी कृषीकन्यांनी मुरघास बनवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि मुरघास बनवण्याच्या प्रक्रियेविषयी विस्तारित माहिती दिली. यावेळी मठाचीवाडी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या समृद्धी मोहिते, प्राजक्ता ननावरे, पूजा मारवाडी, साक्षी शिंदे, समृद्धी उल्हारे, हर्षदा लोखंडे, शिवांजली धुमाळ व समृद्धी कुंजीर यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीने मुरघास बनवण्याचे प्रात्यक्षिक शेतकर्यांसमोर सादर केले.