दिवसाढवळ्या दगडाने ठेचून एकाचा खून


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२१ । सातारा । सातारा शहरातील दिव्यानगरी येथे संतोष उर्फ विठ्ठल सुळ (वय ४५, रा. दिव्यनगरी) याचा एका टोळीने खून केल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर दांडके व दगडाचा वापर करून ठेचून खून करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता दिव्य नगरी रस्त्यात अडवून हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आर्थिक देवाण, घेवाण व जमिनीच्या कारणातून हा खून झाल्याचे समोर येत आहे. संशयितांनी हल्ला केल्यानंतर सुळ गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांचा घटनस्थळाचा पंचनामा सुरू असून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.


Back to top button
Don`t copy text!