सालपे येथे एकाचा अज्ञाताकडून खूनं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । लोणंद । लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे ता. फलटण येथील एसटी थांब्या जवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दोघा भावांनी केलेल्या मारहाणीत बापु संभाजी निकम वय वर्ष ३८ याचा जागीच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली  सदर घटनेनंतर परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

याबाबत लोणंद पोलिस स्टेशन आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बापू निकम आणि हल्लेखोर एकमेकांना ओळखत असल्याचे समजते. हल्लेखोरांपैकी एकाच्या भावाला शिविगाळ केल्यामुळे चिडून जाऊन दोघा भावांनी मिळून सालपे एसटी स्टँण्ड जवळ बापू निकम यास काठ्यांनी केलेल्या मारहाणीत बापू निकम याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून हल्लेखोर दोन्ही भाऊ सौरभ संजय जगताप व गौरव संजय जगताप (दोघे रा. सालपे ता.फलटण) फरार झाले आहेत.  लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली,  उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनीही घटनेची गंभीरता लक्षात घेऊन घटनास्थळी जावून पहाणी करून तपासाबाबत सूचना दिल्या . पंचनामा करून मृत बापू निकम यांचा मृतदेह लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला . या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत .


Back to top button
Don`t copy text!