दैनिक स्थैर्य । दि. २९ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी या गावात एका युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास घरगुती वादातुन ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.विशाल आप्पासॊ येवले वय 24 मयत युवकाचे नाव आहे . औंध पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून एकाचा शाेध सुरु आहे. वडी गावात बुधवारी रात्रीच्या सुमारास घरगुती वादाचे मारामारीत रूपांतर झाले.
या मारामारीत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच औंध पोलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले आहे. एकाचा शाेध पाेलिस करीत आहेत.पाेलीसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी दोन महिलांचा समावेश असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान श्वानपथकासह गुन्हे अन्वेषणचे पथक रात्री उशिराच घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु असल्याचे सांगितले.
विशाल आप्पासॊ येवले वय 24 मयत युवक या मारामारीत विशाल आप्पासो येवले (२४) (मयत) आणि नात्याने मामा सासरे असणारे पोपट मोहन येवले (४५),मनोज मोहन येवले (३६), आणि या दोघांच्या पत्नी वैशाली मनोज येवले (३०), पोपट मोहन येवले (४५), वंदना पोपट येवले(४१) व मुलगा करण पोपट येवले (१९) यांच्या मध्ये झालेल्या भांडणात विशाल याच्या शरिरावर वर्मी वार झाल्याने त्यास उशीरा कराड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याने वरील संशयित चौघांना औंध पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर करण पोपट येवले (१९) फरार असून त्याचा शोध सुरू आहे.