कराडच्या रूक्मिणीनगर येथे महिलेचा खून


दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । सातारा । गेल्या दीड महिन्यात कराड शहर परिसरात खुनांची मालिका सुरू असून, कराडच्या रूक्मिणीनगर परिसरात ३४ वर्षीय महिलेेचा खून झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रूक्मिणीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या ठाणेकर कुटूंबातील महिलेचा निर्घृण खून झाल्याचे शनिवारी उघडकीला आले. शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा असल्याने पोलीस बंदोबस्तात असतानाच सकाळी रूक्मिणीनगर येथे खून झाल्याची घटना समोर आली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या महिलेच्या खुनाच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे काम सुरू होते. दरम्यान खुनाच्या घटनेने रूक्मिणीनगर परिसर पुन्हा एकदा हादरून गेला.


Back to top button
Don`t copy text!