पत्नीच्या चारीत्र्याच्या संशयावरुन झालेल्या मारहाणीत 22 वर्षीय तरुणाच्या खुन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, फलटण, दि.१९ :  ऐन दीपावली पाडवा व भाऊबीजेच्या दिवशी मुंजवडी ता. फलटण येथे सिमेंटच्या कट्ट्यावर आपटून 22 वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली आहे. आशिष सुनिल माने वय 22 असे मृत तरुणाचे नाव आहे. मयताच्या पत्नीच्या चारीत्र्याच्या संशयावरुन झालेल्या मारहाणीत सदर घटना घडली आहे. या प्रकरणी सहा संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याचे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक नितीन सावंत यांनी कळविले आहे.

सर्व धर्मियांची मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या  माहितीनुसार, आशिष यांची सासरवाडी गावातच आहे. पत्नी कामिनी हीस त्यांनी भाऊबीजेला मुंजवडी गावातील तीच्या माहेरी सोडले होते, दुपारी ते पत्नीला घरी परत घेवून आले तेंव्हा कामिनी यांनी आपली सासू सुनिता सुनिल माने यांना सांगितले की, मुंजवडी गावातील अर्चना दादा खोमणे, तीचा मुलगा रोहित दादा खोमणे व बहिण जया बाळू जाधव यांनी माझ्या माहेरघरी येवून आई सविता मधुकर येडे व आपणास माझ्या चारित्र्याचा संशय घेवून मुलगा रोहित यास सारखा फोन करते असे म्हणत शिवीगाळ केली आहे. या नंतर सायंकाळी पाचच्या सुमारास रोहित दादा खोमणे रा. मुंजवडी, आशाबाई उर्फ नकुसा अरुण आडके रा. पाटस जि. पुणे, दत्तु बबन सितकल रा. मुंजवडी, सुनिल अरुण आडके (रा. पाटस जि. पुणे,), जया बाळू जाधव (रा. आसू ता. फलटण), अर्चना दादा खोमणे रा. मुंजवडी हे मुंजवडीतील रामोशी आळीतील आशिष माने यांच्या घरासमोर आले व शिवीगाळ करु लागले. यावेळी अर्चना खोमणे यांनी आपला मुलगा रोहित यास तुझी सुन कामिनी ही सारखी फोन करुन बोलावते असे सुनिता माने यांना म्हणत घरासमोर उभा असलेल्या त्यांचा मुलगा आशिष यास रोहित खोमणे, दत्तु सितकल, सुनिल आडके यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली व सिमेंट कट्ट्यावर जोरात आपटले. या मारहाणीत तो जागेवरच बेशुध्द पडला. सुन कामिनी हीस लाथा-बुक्यांनी, दगड-विटांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यास मध्ये पडलेल्या आशिष याचा भाऊ संकेत यालाही सुनिल आडके याने कुर्‍हाडीने डोक्यात मारले असल्याचे आरोप फिर्यादित करण्यात आले आहेत. या वेळी झालेला आरडाओरड व गोंधळ ऐकुन शेजारी पाजारी जमा झाल्यानंतर ते सर्वजण शिवीगाळ व धमकी देत पळून गेले. या नंतर बेशुध्दावस्थेतील आशिष यास फलटण येथे खाजगी रुग्णालयात आणले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मयत आशिष याची आई सुनिता सुनिल माने वय 40 रा. मुंजवडी यांनी वरील आरोपींविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीसांनी वरील सहा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांनी घटना स्थळास भेट देवून तेथील पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितिन सावंत करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!