स्थैर्य, सातारा, दि.०७: बहिणीस त्रास देत असल्याच्या कारणावरून सातार्यानजिक खंडोबाचा माळ येथे आकाश राजेंद्र शिवदास या युवकाचा निर्घृण खून करून मृतदेहाची पेटवून विल्हेवाट लावण्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीनजणांना अटक केली असून विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे वय 19, तेजस नंदकुमार आवळे वय 19 व संग्राम बाबू रणपिसे वय 28 सर्व रा. रविवार पेठ सातारा अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, मंगळवार, दि. 6 रोजी सकाळी नऊच्या सुमारास सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथे जळालेल्या अवस्थेमधील मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अज्ञात इसमाचा खून करुन मृतदेह जाळून पुरावा नाहीसा केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या.
त्याअनुषंगाने पोनि किशोर धुमाळ यांनी रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखालील तपास पथकास अज्ञात आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. या पथकाने परीसरातील साक्षीदार यांच्याकडे विचारपूस करुन तसेच गोपनिय माहिती प्राप्त केली. त्यानुसार मृत युवकाचे नाव आकाश राजेंद्र शिवदास, रा. रामनगर, ता. सातारा असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी मयताचे कोणाशी वैर अगर भांडणतंटे आहेत काय याची माहिती घेवून संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे खपींशीीेसरींळेप डज्ञळश्रश्र चा वापर करुन सखोल चौकशी केली असता त्यांनी आकाश उर्फ रॉजर राजेंद्र शिवदास हा विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे याच्या बहिणीस त्रास देत होता. या कारणावरुन चिडून जावून त्यास दि. 06 रोजी मध्यरात्री खंडोबाचा माळ येथे डोक्यात दगड टाकून त्याचा खून करुन त्याचा मृतदेह जाळून टाकला असल्याचे सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, स. फौ. जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, पो. हवा.कांतीलाल नवधणे, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, पो.ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, प्रविण पवार, अमित सपकाळ, पो.कॉ.रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, गणेश कचरे, पंकज बेसके यांनी ही कारवाई केलेली आहे.
पोलीस अधीक्षकांकडून टीमचे कौतूक
गुन्हयाचे तपासामध्ये जिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी सहकार्य केले आहे. गुन्ह्याचे तपासात जळालेला मृतदेह पुरुष की स्त्री याबाबत खात्री होत नसताना तसेच कोणताही पुरावा नसताना अत्यंत कमी वेळत मयताची ओळख पटवुन गोपनीय बातमीदारांच्या आधारे संशयीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास कौशल्याचा वापर करुन विचारपुस करुन सदरचा क्लिष्ट गुन्हा 3 तासात उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी कारवाई मध्ये सहभागी स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी च अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे .