आरटीओ परिसरातील अतिक्रमणे पालिकेने हटविली मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने दिव्यांग झोन जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा पालिकेच्‍या अतीक्रमणविरोधी पथकाने आज आरटीओ परिसरातील अतीक्रमणे हटवत त्‍या जागा दिव्‍यांग बांधवांना उपलब्‍ध करुन दिल्‍या. या कारवाईस काही राजकीय संघटनांनी आक्षेप घेतल्‍याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सातारा पालिकेने आरटीओ परिसरात दिव्‍यांग झोन जाहीर केला असून त्‍याठिकाणी अतीक्रमणे आज पालिकेने काढण्‍याचा निर्णय घेतला होता. यानुसार पालिकेचा अतीक्रमण हटाव पथक त्‍याठिकाणी दाखल झाले. या पथकाने रस्‍त्‍यालगत असणाऱ्या चहाच्‍या टपऱ्या तसेच शेड हटविण्‍याचे काम सुरु केले. अतीक्रमण हटविण्‍याचे काम सुरु असतानाच त्‍याठिकाणी एका राजकीय संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले. त्‍यांनी कारवाईस विरोध दर्शवल्‍याने तणाव निर्माण झाला होता.

चर्चेअंती त्‍याठिकाणी असणाऱ्या सातारा शहर पोलिस ठाण्‍याच्‍या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हस्‍तक्षेप करत कारवाई तडीस नेली. कारवाईदरम्‍यान त्‍याठिकाणच्‍या टपऱ्या हटविण्‍यात आल्‍या. अतीक्रमण हटविल्‍यानंतर ती जागा दिव्‍यांग झोननुसार दिव्‍यांग बांधवांसाठी विविध व्‍यवसायांसाठी देण्‍यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!