नगरपालिकेने दलित वस्ती सुधारणा अंतर्गतचा मागासवर्गीय निधी आरोग्य विभागाकडे वर्ग करावा – आर.पी.आय.चे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.१८: फलटण शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षभरापासून विकासकामे होत नसल्याने फलटण नगरपरिषदेकडून खर्च न झालेला दलित वस्ती सुधारणा अंतर्गत 15% मार्गासवर्गीय निधी कोरोनाविरोधात लढण्यासाठी आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात यावा; अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

फलटण नगरपरिषदेत कार्यरत असताना कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त कर्मचारी संदेश चव्हाण यांचा कोरोनाने मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या वारसास पालिकेकडे सेवेत सामावून घ्यावे व पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सर्जेराव काकडे यांच्या पत्नी सुनिता काकडे यांचाही कोरोनाने मृत्यू झाला असून या दोन्ही कुटूंबांना 50 हजार रुपयांची मदत करावी. तसेच कोरोना बाधित मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणार्‍या पालिकेच्या कर्मचार्‍यांना विमाकवच द्यावे. मंगळवार पेठेत दररोज औषध फवारणी आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

प्रारंभी पालिकेचे नूतन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांचे आरपीआयच्यावतीने पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विजय येवले, मुन्ना शेख, राजु मारुडा, संजय निकाळजे, लक्ष्मण अहिवळे, सतिश अहिवळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!