नगरपालिकांचा बिगुल वाजला; प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२२ । फलटण । राज्यातील मे २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या “अ” वर्गातील एकूण १६, “ब” वर्गातील ६८ आण “क” वर्गातील १२० तसेच नवनिर्मित ४ नगरपरिषदांसह (अ+ब+क-२०८ नगरपरिषदा) नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रभाग रचना कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेला आहे. त्याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पारित केलेले आहेत.

– काय आहे नक्की प्रभाग रचना कार्यक्रम –

नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर दोन परिषद सदस्य, परंतु तीनपेक्षा अधिक नाहीत इतके सदस्य निवडून देण्याची तरतूद केली आहे. नागरिकांच्या मागासर्व प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपील (सी) क्र.१९७५६/२०२१ मध्ये दि.१९/०१/२०२२ रोजी झालेल्या आदेशानुसार राज्याने नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाबाबत असलेली आकडेवारी संबंधित मागासवर्ग आयोगास द्यावी. मागासवर्ग आयोगाने सदर आकडेवारी तपासून त्यानुसार योग्य त्या शिफारसी राज्यास तसेच राज्य निवडणूक आयोगास कराव्यात, असे आदेशित केले आहे. मात्र सदर शिफारसी प्राप्त होण्यास अथवा त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकांचे कामकाज विहीत कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहिर केलेला आहे.


Back to top button
Don`t copy text!