दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । मुंबई । भारतात पर्यावरणाप्रती जागरूकता वाढवण्याच्या कटिबद्धतेसाठी मुंबईच्या मोनिषा नरकेला एमजी चेंजमेकर्सने सन्मानित करण्यात आले आहे. ती ‘आरयूआर ग्रीनलाइफ’ द्वारे लक्षणीय प्रभाव निर्माण करत आहे. एमजी चेंजमेकर्स हा सामुदायिक उपक्रम आहे, जो नवोन्मेष्काराच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्व विषमतांवर मात करणाऱ्या निश्चयी व धाडसी महिलांना प्रशंसित व सन्मानित करतो.
मुंबईत जन्मलेल्या मोनिषा नरकेने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, यूएसए येथून एमएम पदवी शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती तिच्या घरी परतली तेव्हा शहरामधील प्रचंड कचरा आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या पारंपारिक कचरा व्यवस्थापन पद्धती पाहून अस्वस्थ झाली. तिने भारतामध्ये कचऱ्याच्या वाढत्या समस्येबाबत काहीतरी करण्याचे ठरवले आणि नागरिकांना लहान-लहान प्रयत्नांसह कचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याबाबत जागरूक करण्याच्या दृष्टिकोनासह एनजीओ आरयूआरची स्थापना केली. एनजीओचे नाव आरयूआर आहे, जे ‘आर यू रेड्यूसिंग, रियुजिंग, रिसायकलिंग’चे संक्षिप्त रूप आहे.
या उद्यमाने टेट्रा पॅक इंडियासोबत सहयोग केला आणि प्रमुख उपक्रम ‘गो ग्रीन विथ टेट्रा पॅक’ सुरू केला. या उपक्रमांतर्गत वापरलेले टेट्रा पॅक कार्टन्स गोळा करण्यात आले आणि त्यांना गार्डन बेंच, स्कूल डेस्क, कोस्टर ट्रे, पेन स्टॅण्ड्स इत्यादी उत्पादनांमध्ये रूपांतरित केले. या उपक्रमाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् २०१३ ने नाविन्यतेसाठी सन्मानित केले. मोनिषा व आरयूआर ग्रीनलाइफ यांना इंडियाज आंत्रेप्रीन्युअर ऑफ द इअर व इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड फॉर कंपोस्टिंग टेक्नोलॉजी अशा अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारांसह सन्मानित करण्यात आले आहे. मोनिषाचे प्रयत्न मुंबई व आसपासच्या भागांमधध्ये परिवर्तनाला चालना देत आहेत, ज्यामुळे ती आश्चर्यकारक परिवर्तनाची आदर्श बनली आहे. यामधून हरित पद्धतींना चालना देण्याच्या ध्येयामागे आवड व अवधान यांचे उत्तम संयोजन दिसून येते.