मुल होण्याचे आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने मुंबई येथील महिलेवर वाई येथे बलात्कार महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । वाई । मुल होण्याचे आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने मुंबई येथील पती आणि सासूचा विश्वास संपादन करुन बावीस वर्षाच्या महिलेला वाई शहरातील एका अपॉर्टमेंटमध्ये आणून तिला डांबून मारहाण करत बलात्कार करण्यात आला. त्यामुळे वाई शहरासह तालुक्यात खळबळ उडली आहे. याप्रकरणी विठ्ठल गणपत पवार (नाव पत्ता माहिती नाही) याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मुंबई येथील एका बावीस वर्षीय महिलेच्या पतीची आणि सासूची विठ्ठल गणपत पवार या व्यक्तीची ओळख होती. त्या व्यक्तीने तिच्या सासरयाच्या गावी मुल होण्याचे आर्युवेदीक औषध मिळते. अशी बतावणी करुन त्या महिलेला वाईमध्ये आणले. वाई शहरातील एका अपार्टमेंटमध्ये आणून एका खोलीत केंडून ठेवले. तसेच मारहाण करत बलात्कार करण्यात आला.विठ्ठल पवार याने चुलत्याच्या गावी यवतमाळ येथे घेवून जावून तेथेही मारहाण करुन जबरदस्तीने त्या महिलेच्या इच्छे विरुद्ध शारिरीक संबंध केले. याची माहिती कोणास दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विठ्ठल पवार याच्याविरुद्ध संबंधित महिलेने कुर्ला मुंबई येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तेथून ही तक्रार वाई पोलीस ठाण्यात आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा झाला असून याचा तपास वाई पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!