दैनिक स्थैर्य । दि.२६ जानेवारी २०२२ । सातारा । मुंबई येथे म्हाडा प्रकल्पांतर्गत फ्लॅट देण्याचे सांगून तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी मिरा रोड मुंबई येथील रेकॉर्ड वरच्या गुन्हेगाराला गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोडोली येथे अटक केली या आरोपीवर चेक बाउन्स करण्याचे व आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी सदर आरोपी मुंबई येथील म्हाडा प्रकल्पांतर्गत गेल्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या लोकांना फ्लॅट देतो असे सांगून गंडवत आहे ही फसवणूक तब्बल 99 लाख 84 हजार रुपयांचे आहे गेल्या तीन वर्षापासून मिरारोड पोलिसांचा या आरोपीचा शोध सुरू होता आर्थिक फसवणूक घेतला हा अट्टल गुन्हेगार साताऱ्यात गोडोली येथे येणार असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना मिळाली सहाय्यक पोलिस अधिक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला यामध्ये वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक वंदना श्री सुंदर व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक समीर कदम यांनी गोडोली येथे सापळा रचून त्या भामट्याला अटक केली
याबाबत या भामट्या वर मिरारोड पोलीस स्टेशन अंतर्गत 420 406 व 34 प्रमाणे गुन्हे नोंद आहेत मीरारोड पोलिसांची एक टीम या यास पकडण्यासाठी येत असून त्यांच्या ताब्यामध्ये देण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे या कारवाईमध्ये हवालदार सुजित भोसले अविनाश चव्हाण ज्योतीराम पवार गणेश घाडगे संतोष कचरे सागर गायकवाड विशाल धुमाळ यांनी भाग घेतला होता