26 कोटींच्या खंडणी प्रकरणात छोटा राजनसह तिघांना मुंबई सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांची शिक्षा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.४: मुंबई सत्र न्यायालयाकडून सोमवारी गँगस्टर छोटा राजन आणि त्याच्या तीन साथीदारांना खंडणी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. छोटा राजनवर 2015 मध्ये पनवेलमधील बिल्डर नंदू वाजेकर यांना धमकावून 26 कोटी रुपयांची खंडणी मागगितल्याचा आरोप आहे. पोलिसांकडे नंदू वाजेकर यांच्या ऑफिसचे सीसीटीव्ही फुटेज आहेत, ज्यात आरोपी वाजेकर यांच्या ऑफिसमध्ये आल्याचे दिसत आहे. याशिवाय, कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांच्या हाती लागली आहे, ज्यात छोटा राजन वाजेकर यांना धमकावत असल्याचे उघड झाले.

छोटा राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्यावरील सर्व प्रकरणे सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. त्यातच हे प्रकरण जोडण्यात आले आहे. हे प्रकरण पनवेलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या राजन तिहाड तुरुंगात कैद आहे.

पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात मागितली होती खंडणी

2015 मध्ये नंदू वाजेकरांनी पुण्यात एक जमीन खरेदी केली होती. त्याबदल्यात एजंट परमानंद ठक्करला 2 कोटी रुपये कमीशन देण्याचे ठरले होते. ठक्करने या प्रकरणी अजून पैशांची मागणी केली, पण वाजेकरांनी नकार दिला. यानंतर ठक्करने छोटा राजनशी संपर्क केला आणि राजनने आपल्या साथीदारांच्या मदतीने वाजेकरांकडून 26 कोटी रुपयांची खंडणी घेतली होती. या प्रकरणात ठक्कर मुख्य आरोपी असून, सध्या तो फरार आहे.


Back to top button
Don`t copy text!