मल्टी-मोडल ट्रांझिट अँपट्यूमॉकचा मुंबईत विस्तार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । मुंबई । जानेवारी २०२१ मध्ये लॉन्च झालेले ट्यूमॉक हे भारतातील पहिले मल्टी-मोडल पेटंटेड पब्लिक ट्रान्सपोर्ट अॅप अलीकडेच मुंबईत लाईव्ह झाले. लॉन्च झाल्यापासून या अॅपच्या युझर्सची संख्या २०००० ने वाढली आहे. यात एकूण प्रवाशांची संख्या १०,००० असून त्यात पुरुष आणि स्त्रिया यांचे गुणोत्तर ७:३ (७०:३०) असे आहे. ट्यूमॉकने आत्तापर्यंत मुंबईत एकूण १८,००० ट्रिप्सचे प्लॅनिंग केले आहे. लॉन्च झाल्यापासून हे अॅप गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरून १ मिलियन वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. गूगल प्ले स्टोअरवर त्याचे रेटिंग ४.५ स्टार्स आहे.

ट्यूमॉकचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिरण्मय मलिक म्हणाले, “आमच्या सेवांमुळे तिकीटांचे आरक्षण करणे सुलभ आणि किफायतशीर झाल्यामुळे नियमित प्रवास करणार्या  प्रवाशांचा समय वाचू शकेल. आम्हाला मुंबईत खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आमचा युझर बेझ लक्षणीयरित्या वाढला आहे. टिकेटिंग / पास बुकिंग प्रणाली लागू करण्याबरोबरच या वर्षाच्या अखेरपर्यंत एकंदर ३० शहरांमध्ये प्रसार करण्याची आमची योजना आहे.

ट्यूमॉकचा फोकस मुख्यत्वे मोठ्या मेट्रो शहरांवर आहे, जेथे सार्वजनिक वाहतूकीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. लोकांना वाहतुकीच्या सर्व सार्वजनिक तसेच खाजगी पद्धतींमध्ये फर्स्ट-माईल आणि लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीचे पर्याय आणि कॉन्टॅक्टलेस टिकेटिंग पर्याय प्रदान करून युझर्सना त्यांचे मार्ग शोधण्यास आणि कोणत्याही त्रासाशिवाय प्रवासाची आखणी करण्यास मदत करण्याचा ट्यूमॉकचा उद्देश आहे. प्रवाशांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी ट्यूमॉक कस्टमर सपोर्ट व्हॉट्सॅप, ईमेल आणि कॉलवर उपलब्ध आहे.


Back to top button
Don`t copy text!