मुळीक बंधू यांचे ‘हॉटेल रोहित’ व ‘सेवागिरी स्वीट्स अँड बेकरी’ दिवाळी पाडव्यापासून फलटणकरांच्या सेवेत


दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
कै. नामदेवराव मुळीक यांचे दोन चिरंजीव अजित मुळीक आणि अक्षय मुळीक हे दोन बंधू ‘हॉटेल रोहित’ व ‘सेवागिरी स्वीट्स अँड बेकरी’ हे दोन्ही व्यवसाय कोळकी कॉर्नर, फलटण येथे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि. २ नोव्हेंबर २०२४ पासून नव्याने सुरू करत आहेत. त्यांनी क्वालिटी, विनम्र आणि तत्पर सेवेची परंपरा कायम ठेवली आहे. हे व्यवसाय असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरतील, असा विश्वास मुळीक बंधू यांच्या मित्रांनी व्यक्त केला आहे.

फलटणकरांच्या सेवेत नव्याने सुरू होणारे ‘सेवागिरी स्वीट अँड बेकरी’मध्ये बर्थडे केक, खारी, बटर, टोस्ट, लादी पाव, डोनेट, क्रीम रोल ऑर्डरप्रमाणे बनवून मिळणार आहेत. या बेकरीमुळे फलटणकरांना उच्च दर्जाची बेकरी उत्पादने योग्य भावात मिळणार आहेत.

तसेच नव्याने सुरू होत असलेले आनंदाचे उपाहारगृह ‘हॉटेल रोहित’ ०२ नोव्हेंबर २०२४ पासून नियमित सुरू होत असून स्वादिष्ट आणि आरोग्यदायी नाश्त्याचे फलटणचे आवडते ठिकाण होईल, यात शंका नाही.

हे दोन्हीही व्यवसाय कोळकी बस स्टॉपसमोर, मालोजीनगर, ता. फलटण येथे सुरू आहेत.


Back to top button
Don`t copy text!