दैनिक स्थैर्य | दि. ८ डिसेंबर २०२३ | फलटण |
विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे या संकल्पनेवर राज्यस्तरीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कला महोत्सवामध्ये सांस्कृतिक (समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक युवा लोकनृत्य), कौशल्य विकास (कथाकथन, पोस्टर स्पर्धा द्विमितीय चित्र, वक्तृत्व स्पर्धा, फोटोग्राफी) संकल्पना आधारित स्पर्धा या प्रकारांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या कु. प्रेरणा आनंद घनवट या विद्यार्थिनीने ‘द्विमितीय चित्र’ या प्रकारात मुलींमध्ये कला उत्सव २०२३-२४ या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला व तिची दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय कला महोत्सवासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
या निवडीबद्दल प्रेरणा घनवट हिला विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणीस अधिकारी दिलीप राजगुडा, प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य देशमुख डी. एम., पर्यवेक्षक शिंदे व्ही. जी., जाधव जी.ए., पर्यवेक्षिका सौ. सुनिता माळवदे, सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.