मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात रंगारंग कार्यक्रमांनी सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० डिसेंबर २०२२ । फलटण । वक्तृत्वाची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या फलटणमधील मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने इयत्ता अकरावी व बारावीच्या आर्ट्स, कॉमर्स व सायन्स शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थी कलाकारांनी आपली कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

फ.ए.सोसायटी संचलित मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार दिनांक 29 /12 /2022 रोजी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन प्र. प्राचार्य डॉ.कदम पी.एच. व कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. वेदपाठक एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या सांस्कृतिक महत्त्वाची सुरुवात प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. दीक्षित एस. जी. यांनी कनिष्ठ विभागामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी व निटनेटके आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. वेदपाठक एस.आर. यांनी मनोगत व्यक्त करताना कनिष्ठ महाविद्यालयाच्या दृष्टीने ऐतिहासिक असा गुरुवार ठरल्याचे सांगितले तसेच अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलाकार सदोदित जागृत ठेवण्याचे आवाहन केले व दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यानंतर गणेश वंदनाने सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली व एकुण 25 विविध रंगी कार्यक्रम इयत्ता अकरावी व बारावीच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले यामध्ये प्रामुख्याने देशभक्तीपर गीत ,पोवाडा , तबला वादन , लावणी , मराठी व हिंदी गीते सादर केली त्यांना सांस्कृतिक विभागातील सदस्य प्रा. तरटे व्ही.बी. प्रा. नाईक निंबाळकर एस. एल., प्रा. मोरे आर. ए . , प्रा. भोसले, प्रा. जाधव , प्रा . शेख , प्रा. ननावरे ,प्रा. सोनावले, प्रा.शिंदे तसेच सर्व वर्ग शिक्षक व प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमात शिस्त राखण्यासाठी एन.सी.सी. चे लेफ्टनंट धुमाळ एस. के., लेफ्टनंट शिंदे एल. एस . व सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.

तसेच कनिष्ठ विभागाने नीटनेटके नियोजन करून सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल प्रभारी प्राचार्य डॉक्टर पी. एच .कदम यांनी कनिष्ठ विभागाचे विशेष कौतुक केले. या महोत्सवाचे रंगतदार सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या शैलीत प्रा. सौ. देशमुख एन.डी. व प्रा. शिंदे डी. एल. यांनी केले व आभार सांस्कृतिक विभाग सदस्य प्रा. शिंदे एम. एस. यांनी मांनले.


Back to top button
Don`t copy text!