दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । फलटण । जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा , फलटण तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय फलटण व मुधोजी हायस्कूल व जुनियर कॉलेज फलटण यांच्या वतीने रविवार दिनांक ७ व ८ अगस्ट २०२२ रोजी श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल फलटण येथे जिल्हास्तरीय नेहरू चषक हॉकी स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलच्या 15 वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला व 17 वर्षाखालील मुलींच्या गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तसेच 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री समीर यादव साहेब- तहसीलदार फलटण ,मा. शिवाजीराव घोरपडे साहेब-चेअरमन क्रीडा समिती फ.ऐ. सोसायटी फलटण, मा. किरण बोळे – पत्रकार दैनिक सकाळ,मा. रोहित अहिवळे – संपादक दैनिक गंधर्वता यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सीनियर हॉकी खेळाडू श्री सुजित निंबाळकर, श्री सचिन लाळगे, श्री विपुल गांधी हे देखील उपस्थित होते. मुधोजी हायस्कूलच्या 15 वर्षाखालील मुलांच्या संघाचा पहिला सामना सैनिक स्कूल सातारा या संघाबरोबर झाला. हा सामना अतिशय चुरशीने खेळला गेला हा सामना 3 – 0 ने जिंकून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात निलेश वेताळ,. फरहान शेख,. सर्वज्ञ तरटे यांनी गोल नोंदवले.
स्पर्धेचा अंतिम सामना के.एस.डी शानबाग, सातारा या संघाबरोबर झाला. हा सामना 4 – 0 गोल ने जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यांमध्ये देवेश मोहिते, गरगटे ओम, शेख फरहान, सर्वज्ञ तरटे यांनी निर्णय गोल केले. तसेच फॉरवर्ड मध्ये स्वदीप कचरे , मोहित मदने यांनी देखील चांगले खेळाचे प्रदर्शन केले .डिफेन्स मध्ये साईराज काटकर,विनय भोईटे ,जाधव विनय गोळे प्रेम, सत्यजित सस्ते, इंगोले अथर्व, जाधव सोहम, व गोलकीपर म्हणून सुमित गोरवे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
17 वर्षाखालील मुलींच्या संघाने देखील अंतिम सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामना के.एस.डी शानबाग ,सातारा या संघाबरोबर झाला. हा सामना 4- 0 गोल ने जिंकला. या अंतिम सामन्यांमध्ये कु.दीक्षा शिंदे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल नोंदवले ,कु. प्रणिता राऊत, कु. सिद्धी केंजळे, कु. निकिता वेताळ यांनी निर्णयक गोल नोंदवले. फॉरवर्ड मध्ये कु. श्रेया गांधी,कु साक्षी पुजारी, कु. श्रुती भोसले यांनी चांगले खेळाचे प्रदर्शन केले. डिफेन्स मध्ये कु. अनुराधा ठोंबरे, कु. अनुष्का केंजळे, कु.सिद्धी काटकर,कु. सिफा मुलानी, कु. श्रेया चव्हाण,कु. कोठी श्रावणी, व कु. तेजस्विनी कर्वे तसेच गोलकीपर म्हणून कु. अनुष्का चव्हाण यांनी देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. 15 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुलीं या दोन संघाची विभाग स्तरीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने देखील या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले.
या सर्व यशस्वी खेळाडूंना शासकीय राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री महेश खुटाळे सर, श्री सचिन धुमाळ सर , श्री खुरंगे बी.बी व कु. धनश्री शिरसागर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी खेळाडूंना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ,श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे सेक्रेटरी ,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, अधीक्षक श्री श्रीकांत फडतरे, मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य श्री गंगवणे बी.एम., उप प्राचार्य ननवरे ए .वाय. ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री फडतरे एम.के., परिवेक्षक श्री काळे सर, क्रीडा समितीचे सर्व सदस्य तसेच प्रशालेतील क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.