
दैनिक स्थैर्य । 29 नोव्हेंबर 2024 । फलटण । इस्लामपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल फलटणच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.
मुधोजी हायस्कूल फलटणच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक मिळवण्याची किमया केली असून या यशाबद्दल संघातील सर्व खेळाडू, संघ प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी अभिनंदन केले आहे.