
दैनिक स्थैर्य । 28 मे 2025। फलटण । येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचा 2024/25 चा इयत्ता दहावीच्या परीक्षामध्ये विद्यार्थ्यानी यश मिळवून उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली.
यावेळी 662 विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते. त्यापैकी 638 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 187 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. 196 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. 189 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. 66 विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी प्राप्त केली. विद्यालयाचा 96.37 % निकाल लागला.
या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. अनुष्का अमोल सपाटे 96.80%, आर्या दादा साळुंखे 96.80%, स्नेहा सुनील नाळे 96.80% या तिघींनी प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक अमन नवाज मनेर 95.80% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. क्रमांक श्रावणी सतीश जाधव 95.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,महाराष्ट्र खो-खो असोसिशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एजुकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, सहायक तपासणी अधिकारी सुधीर अहिवळे, प्राचार्य शेडगे, उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील, फलटण एजुकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.