दैनिक स्थैर्य | दि. ३० जुलै २०२४ | फलटण |
फलटण येथे रविवार, दि. २८ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार शिक्षण सप्ताहाच्या समारोपप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूलमध्ये विद्यार्थांना स्नेहभोजन देऊन शिक्षण सप्ताहाची सांगता करण्यात आली.
शैक्षणिक सप्ताहानिमित्त फलटण शहरातील मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण विद्यालयाच्या वतीने सप्ताहानिमित्त कृतीयुक्त अध्ययन, अध्यापन, मूलभूत संख्याज्ञान साक्षरता जनजागृती, क्रीडा दिन, सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण, कौशल्य विकास व संगणक साक्षरता, राष्ट्रीय एकात्मता ही उद्दिष्टे घेऊन व समारोप विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन शैक्षणिक सप्ताहाचा समारोप केला गेल्याची माहिती प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी दिली.
यावेळी पर्यवेक्षक नितीन जगताप, शिक्षक प्रतिनिधी संतोष तोडकर व सौ. थोरात मॅडम, सचिन धुमाळ, अमोल नाळे, शालेय पोषण आहराचे प्रमुख एस. गोंधळी, राजेंद्र गोडसे, दिलीप जाधव, बी. बी. खुरंगे, चंदन कर्वे, शामराव आटपाडकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षण सप्ताह या अभियानात राष्ट्रीय एकात्मता, वृक्षारोपण व संवर्धन, तंबाखूमुक्त अभियान, बेटी बचाओ, बेटी पढाओ, अंमली पदार्थ विरोधी अभियानाची जनजागृती करण्यात आली. मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
प्राचार्य सुधीर अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सप्ताह साजरा करण्यात आला.