फलटणच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीची बोर्ड परीक्षा २ मार्चपासून सुरू होणार; बैठक व्यवस्था जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे आयोजित केलेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षा मार्च २०२३ मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, फलटण केंद्र क्र. १००१ येथे दि. ०२ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत होत असून परीक्षा मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे बैठक क्रमांक ऋ०२४०८० ते ऋ०२४८५६ या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे. या सेंटरवरती मालोजीराजे विभाग, लक्षीदेवी विभाग, व्यंकटेश विभाग व किशोरसिंह विभाग या चार विभागात बैठक व्यवस्था असणार आहे. या ठिकाणी एकुण ७८७ रेग्युलर विद्यार्थी व रिपीटर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्व विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी.

विद्यार्थ्याने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश पत्र (रिसीट) / हॉल तिकीट, ओळख पत्र व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे. उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमनध्वनी (मोबाईल), टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, पॉकेट कॅलक्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने/ उपकरणे परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई आहे.

विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा द्यावी. तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रप्रमुख श्री. एस.एम. काळे व प्राचार्य श्री. बी. एम. गंगवणे, उपप्राचार्य श्री. ए. वाय. ननावरे, श्री. एम. के. फडतरे, पर्यवेक्षक सौ. बगाडे एस. ए., श्री. शिंदे व्ही. जी. यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!