
स्थैर्य, फलटण, दि. 9 ऑक्टोबर : वाई येथील किसनवीर महाविद्यालयात झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय तिरंदाजी स्पर्धेत, येथील मुधोजी महाविद्यालयाच्या अजित श्रीराम याने कांस्यपदक पटकावले आहे. त्याने ‘कंपाऊंड राऊंड’ या क्रीडा प्रकारात हे यश मिळवले.
या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य अरविंद निकम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी अजित श्रीरामचे अभिनंदन करून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.