
दैनिक स्थैर्य । 12 मार्च 2025। फलटण । येथील मुधोजी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार (दि. 13 मार्च) रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ. ललिता बाबर भोसले या उपस्थित राहणार आहेत. तसेच अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असून यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी, यशवंत खेळाडू, अव्वल कलाकार यांना अतिथींच्या हस्ते पारितोषिक व ट्रॉफीज तसेच रोख रक्कमेच्या स्वरुपात पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गुणगौरव समारंभ समिती व प्राचार्य मुधोजी महाविद्यालय यांच्यावतीने करण्यात आले आहे.