
दैनिक स्थैर्य । 23 मार्च 2025। फलटण – येथील मुधोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी अॅड. डॉ. अशोक कृष्णा शिंदे यांना वन विभाग सातारा परिक्षेत्रचा वन्यजीव संवर्धन व निसर्ग संवर्धनामध्ये करीत असलेल्या कार्याबाबत वनश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
जागतिक वन दिवसा निमित्त ’वन वनवा परिसंवाद’ व ’पुरस्कार वितरण’ कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला.
याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्य अरविंद निकम,प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, डॉ. टी. पी. शिंदे, डॉ. प्रभाकर पवार, डॉ. ए. एन. शिंदे एनएसएस विभागाचे अॅड. डॉ. ए. के. शिंदे , प्रा. एस. एम. लवांडे, डॉ. वाय. आर. मठपती, प्रा. ललित वेळेकर, प्रा. अक्षय अहिवळे प्रा. किरण सोनवलकर, डॉ. अभिजीत धुलगुडे, डॉ. डी. एम. जगताप, प्रा. रेश्मा निकम, प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी, एनएसएसविभागाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी अभिनंदन केले.