
दैनिक स्थैर्य | दि. १० मार्च २०२५ | फलटण | फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी सचिन ढोले यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर फलटणचा कार्यभार हा पर्यवेक्षित उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेला होता.
त्यानंतर नियमित उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे असणाऱ्या सौ. प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.