फलटणच्या कु. देविकाचे पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक


दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण’ची सुवर्णकन्या राष्ट्रीय विजेती भारताची बॉक्सर कु.देविका सत्यजीत घोरपडे (गजेंद्रगडकर) हिने दि.१२ ते १८ सप्टेंबर २०२२ रोजी सर्बिया येथे झालेल्या गोल्डन ग्लोव्हस आंतरराष्ट्रीय युथ बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले.

अंतिम सामन्यात तिने सर्बियाच्या प्रतिस्पर्ध्यावर ४-१ अशी सहज मात केली.

देविकाच्या या पहिल्या आंतराष्ट्रीय सुवर्ण यशाबद्दल तिचे व देविकाचे प्रशिक्षक ऑलम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे अभिनंदन करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!