
दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२२ । सातारा । सातारा येथील शिवाजी उदय मंडळाचे अध्यक्ष गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या वहिनी व सामाजिक कार्यकर्ते जयंत उथळे यांच्या मातोश्री श्रीमती लीलावती रामचंद्र उथळे ( ९३) यांचे वृद्धापकाळाने सातारा येथे निधन झाले.
त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूपश्चात देहदान करण्यात आलेले आहे. मृत्युपश्चात कोणतेही धार्मिक विधी करण्यात केले नाहीत. त्यांच्यामागे मुलगा जयंत तसेच सून व दोन विवाहित मुली , जावई , नातवंडे , नात सुन असा परिवार आहे.
कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी येथे अनाथ महिलांसाठी त्या आसरा महिला आश्रम चालवत होत्या व अखेरपर्यंत तिथेच राहत होत्या. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहून अंत्यदर्शन घेतले.