
दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील गोखळी येथील तिरंगा पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या कुमारी स्वरा योगेश भागवत हिने पुणे युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पातळीवरील शालेय आर्चरी (धनर्विद्या) क्रिडा स्पर्धा २०२३-२४ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकावले.
कुमारी स्वरा हिला कोच संतोष भोसले सर यांनी मार्गदर्शन केले. लहान वयात कुमारी स्वरा हिने पहिल्या प्रयत्नात यश मिळविले. कुमारी स्वरा हिने यापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर केले आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी १२ तासात १४३ किमी सायकलिंग करुन कमी वयात विक्रम, एका मिनिटात शंभर पूशअपस्, ५० प्रकारच्या दोरउड्या, वयाच्या तिसर्या वर्षी पोहायला शिकली, अशा विविध प्रकारच्या विक्रमाची नोंद घेऊन ‘वर्ल्ड बुक ऑफ इंडिया’ने नोंद घेऊन गौरव केला आहे.
तिच्या या यशाबद्दल तिरंगा पब्लिक स्कूलचे चेअरमन रणजित शिंदे, सचिव सौ. रेखाताई गावडे, तिरंगा पब्लिक स्कूलचे संचालक मनोजतात्या गावडे (सवई), सरपंच सुमनताई गावडे, उपसरपंच स्वप्नाली गावडे, खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे, तिरंगा पब्लिक स्कूल प्राचार्य सुरवसे सर यांनी अभिनंदन केले.