दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । फलटण । सध्या संपूर्ण देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यामध्ये फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. १० मध्ये माजी नगरसेविका सौ. सुवर्णा अमरसिंह खानविलकर यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामधील प्रत्येक घरी तिरंगा ध्वजाचे मोफत वितरण करण्यात आलेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. १० मध्ये नगरसेविका सौ. सुवर्णा अमरसिंह खानविलकर यांच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आलेले आहे.
यावेळी वाटप करताना शिक्षक नेते संतोष निंबाळकर व सामाजिक कार्यकर्ते अजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.