सौ .सुचित्रा जाधव यांना पी एच डी


दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । बारामती । बार्शी येथील शिवाजी महाविद्यालय च्या प्राध्यापीका सौ सुचित्रा सुभाष जाधव यांना प्राणिशास्त्र या विषयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची ‘पी एच डी ‘ प्राप्त झाली असून सौ जाधव यांनी’ लोकसंख्या गतिशीलता अभ्यास भारतातील सोलापूर जिल्ह्यातील गॅलस, गॅलस, डोमास्टिक मधील परजीवी ‘ या वर शोधनिबंध सादर केला होता.

या कामी त्यांना सोलापूर कॉलेज चे डॉ लक्ष्मी मुशन व शिवाजी कॉलेज चे बोर्ड ऑफ स्टडीज चे चेअरमन डॉ यु व्ही गव्हाणे आणि वालचंद कॉलेज, सोलापूर चे डॉ कोथुर राव यांनी मार्गदर्शन केले. गेली तेरा वर्षा पासून सौ जाधव शिवाजी कॉलेज येथे अध्ययनाचे काम करतात
त्यांच्या यशा बदल शिवाजी कॉलेज च्या प्राचार्या डॉ भारती रेवडकर , डॉ.आर एस.चाटी व इतर सहकारी प्राध्यापक, व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ चे चेअरमन व सर्व विषवस्त यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!