स्थैर्य, औंध, दि. १०: “माझे कुटुंब ,माझी जबाबदारी “हे ब्रीद जोपासत शासनाने प्रत्येकाला कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी आवाहन केले असतानाच औंध गावच्या महिला ग्रामपंचायत सदस्या सौ.शितल देशमुख यांनी ही माझा प्रभाग ,माझी जबाबदारी हे शिवधनुष्य पेलत आपला वाँर्ड (प्रभाग)कोरोनामुक्त राहण्यासाठी कंबर कसली असून त्यांनी आपल्या प्रभागातील देशमुख गल्ली,केदार चौक परिसर, मारुती मंदिर परिसरात स्वतः जातीने लक्ष घालून जंतूनाशक फवारणी केली असून त्यांनी सुरू केलेल्या या कार्याचे औंध परिसरात कौतुक करण्यात येत आहे.
याकामी त्यांना त्यांचे पती गणेशराव देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून यापुढील काळात आपला प्रभाग कसा कोरोनामुक्त राहिल यासाठी त्या विशेष काळजी घेणार असून कोरोनाबाधित रुग्णांची व कुटुंबियांची ही त्या विचारपूस करत असून आरोग्य विभागाच्या मदतीने त्या कुटुंबाला मदत करीत आहेत.
त्यांच्या या कार्याबद्दल औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दिपक नलवडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे.