
दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । फलटण । निवृत्त तहसीलदार हणमंतराव नलवडे, रा. बारस्कर गल्ली, फलटण यांच्या सुविद्य पत्नी सौ. शांताबाई हणमंतराव नलवडे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पकालीन आजाराने नुकतेच राहत्या घरी निधन झाले.
फलटण शहर व तालुक्यातील तसेच बाहेर गावचे आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्यासह राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी अंत्यदर्शन घेऊन नलवडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
फलटण येथील नगर परिषद स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाटबंधारे खात्यातील उप अभियंता अनिल नलवडे यांच्या त्या मातोश्री होत.