भुईंज ग्रा.पं.सदस्या सौ.शैला पिसाळ यांचा तडकाफडकी राजीनामा


दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । भुईंज । भुईंज ग्रामपंचायत सदस्या सौ. शैला जयवंत पिसाळ यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. चार दिवसांपूर्वी पंचायतीच्या नवीन इमारतीचे उदघाटन झाले असताना सौ. पिसाळ यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सौ. पिसाळ यांचे जय भवानी महिला संघटनेच्या माध्यमातून मोठे कार्य आहे. विविध उपक्रम राबवून त्यांनी महिलांचे उत्तम संघटन केले आहे. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यात कारण स्पष्ट केले नाही. त्यामुळे नेमक्या कोणाला वैतागून त्यांनी राजीनामा दिला याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


Back to top button
Don`t copy text!