
दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण येथे झालेल्या तालुका स्तरावरील कराटे स्पर्धेत हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळी विद्यालयातील इयत्ता नववीतील कु. भक्ती बापू वीरकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला तिची जिल्हा स्तरावरील कराटे स्पर्धेसाठी निवड झाली.
कु. भक्ती वीरकर (DSM) किंग फायटर क्लब च्या प्रशिक्षक दिपाली मदने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. तालुकास्तरील स्पर्धेसाठी इयत्ता नववीतील तीन विद्यार्थी सहभागी झाले होते. आविष्कार नितीन जगताप व यश बाळासाहेब गावडे यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. या यशस्वी स्पर्धकांना DSM कराटे क्लबच्या प्रशिक्षक दिपाली मदने यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी स्पर्धकांचे व प्रशिक्षक दिपाली मदने यांचे विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ अभंग यांनी अभिनंदन केले.