स्थैर्य, फलटण, दि. ०७ : शहरातील बुरुड गल्ली येथील श्रीमती सरस्वती वासुदेव बडबडे (वय ७९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील नायब तहसीलदार किशोर बडबडे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पच्छात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.