दैनिक स्थैर्य । दि.०४ फेब्रुवारी २०२२ । फलटण । प्राध्यापक पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत फारांदवाडी गावच्या स्नुषा प्रा. सौ. मंजुषा मनोज बोराटे यांनी 26 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सेट परीक्षेत इंग्लिश विषयात चांगल्या गुणांसह यश संपादन केले आहे.
सौ. बोराटे ह्या गेली 8 वर्ष फलटण एज्यूकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश माध्यमाच्या शाळेत सहशिक्षक या पदावर कार्य करीत आहेत. इंग्रजी विषयातून यांनी एमफील ही पदवी सुद्धा संपादन केली आहे.
या यशा बद्दल संस्थेचे विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मार्गदर्शक डॉ. ए. वाय. शिंदे, मुधोजी महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. कदम इंग्रजी विषयाच्या विभाग प्रमुख डॉ. बोबडे डॉ. दीक्षित, डॉ. जगताप तसेच इतर प्राध्यापक, सहकारी सहशिक्षक व फरांदवाडी ग्रामपंचायत चे सरपंच, सदस्य ओंकार गणेश मंडळ, दुर्गादेवी मंडळ, म्हस्कोबा गणेश मंडळ कृषी क्रांती कंपनीचे अध्यक्ष अरविंद मेहता, सुभाष भांबुरे, प्रकाश पवार कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक यांनी सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.