
दैनिक स्थैर्य । 5 मे 2025। फलटण । कोळकी येथील सौ. लक्ष्मीबाई गणपत दीक्षित (वय 85) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात पती, 2 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे मूळ गाव मौजे कारुंडे, ता. माळशिरस हे आहे. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित म्हसवड कॉलेजचे प्राचार्य संजय दिक्षित यांच्या त्या मातोश्री होत. दशक्रिया विधी गुरुवार दि. 8 मे रोजी सकाळी श्री दत्त मंदिर घाट नीरा येथे होणार आहे.