कु. देविका घोरपडे भविष्यात ऑलिंपीक पदक जिंकेल : श्रीमंत संजीवराजे


दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । फलटण । ‘‘फलटणला खेळाची परंपरा लाभली असून कु.देविका घोरपडे ने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत दैदिप्यमान मिळवलेले यश फलटणला अभिमानास्पद आहे. येत्या काळात कु.देविका ऑलिंपीकमध्येही सुवर्णपदक जिंकेल’’, असा विश्‍वास महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

स्पेन येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत विश्‍वविजेती ठरलेल्या. कु.देविका घोरपडे हिचा फलटण एज्युकेशन सोसायटीच्यावतीने मुधोजी हायस्कूलच्या प्रांगणात आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते.

‘‘यश मिळवण्यासाठी खडतर प्रवास करावा लागतो. कु.देविकानेही असाच खडतर प्रवास केला असून तो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे’’, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी नमूद केले.


Back to top button
Don`t copy text!