
दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२१ । सातारा । विजयदुर्ग येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत साताऱ्याच्या मृदुला संतोष पुरी गोसावी हिने ८ मिनिट ३६ सेंकदात १ कि.मी. अंतर पार करून सुवर्णपदक पटकावले. विजयदुर्ग येथील श्री. दुर्गामाता कला क्रिडा आणि सांस्कृतीक मंडळ यांनी आयोजित केलेल्या सी स्वीमिंग कॉम्पिटिशन २०२१ या स्पर्धेत १२ ते १४ वयोगटात तिने हे यश मिळवले. तीला प्रशिक्षक भगवान चोरगे, श्रीमंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विविध स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.