दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२३ । सातारा । सातारा जिल्ह्यातील मृदंग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व मृदंगाचार्य श्री मदन कदम यांनी महाराष्ट्रसह जागतिक पातळीवर आपल्या मृदंग वादनाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह जिल्ह्याला नावलौकिक प्राप्त करून दिला आहे. हजारो विद्यार्थी त्यांनी मृदंग वादनामध्ये पारंगत केले आहेत. हे महान कार्य सातारकरांना निश्चितच अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या समारंभामध्ये मृदंगाचार्य मदन कदम यांना मृदंग सेवा पुरस्कार प्रदान करताना काढले. पुरस्काराचे स्वरूप गौरव पत्र स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व रोख रक्कम असे होते.वारकरी स्नेहसंमेलन व स्नेह मेळावा श्री लीला रिसॉर्ट, अनावळे, कास रोड, सातारा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे हे होते. ज्यांच्या मृदंग वादनाने अवघा महाराष्ट्र भक्तिमय होतो. वारकरी संप्रदाय आणि श्रीपती माने यांच्या माध्यमातून दिला जाणारा पुरस्कार हे वस्तूंचं हस्तांतर नाही तर त्या पाठीमागे असणाऱ्या सद्भावना ह्याच अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. असे मनोगत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ विचारवंत महंत श्री प्रमोद महाराज जगताप हे होते. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात अग्रक्रमाने मृदंग वादनामध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख आदरार्थी केला जातो, ते मृदंगाचार्य मदन कदम यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी मृदंग वादनामध्ये पारंगत केलेले आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये घेतलेली आहे.हे कार्य सांप्रदायासाठी अभिमानास्पद आहे. असे गौरव उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. या कार्यक्रमासाठी सहकार महर्षी ज्ञानेश्वर वांगडे (भाई) मा. राजीव भोसले ( भैय्या) जि प सदस्य सातारा, मा. मांढरे साहेब (रि. ए.सी.पी. कोल्हापूर) प्राचार्य एन. जी. गायकवाड,या.सुजित शेख, ह. भ. प. प्रवीण महाराज शेलार, ह. भ. प. बबनराव सापते व वारकरी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते