दैनिक स्थैर्य । दि. ३० मार्च २०२२ । फलटण । साखरवाडी ता. फलटण येथील श्री दत्त इंडिया कंपनीच्या साखर व डीस्टीलरी विभागास ब्राझीलच्या बी. पी. बुंगे बायोएनर्जी उत्पादन व संशोधन विभागातील टॉमस, क्लिबर, डेबोरा व त्वाईस या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली. श्री दत्त इंडियाचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
या भेटी दरम्यान बी. पी. बुंगे बायोएनर्जी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी टॉमस म्हणाले, श्री दत्त इंडिया कंपनीने अवघ्या ८ महिन्यामध्ये डीस्टीलरी प्रकल्पाची उभारणी करुन त्यामधून उत्पादन सुरु केले ही कौतुकास्पद बाब आहे तसेच कारखान्याच्या विस्तारीकरण व को – जनरेशनचे काम सुद्धा अतिशय नेटक्या नियोजनाने सुरु असून पुढील वर्षीचा गळीत हंगाम श्री दत्त इंडिया अतिशय जोमाने पार पाडेल यात शंका नाही. यावेळी कारखान्याचे चीफ इंजिनीअर किरण पाटील, राजेंद्र भोसले, चीफ केमिस्ट नागेश पवार, डिस्टीलरीचे जनरल मॅनेजर राहुल टिळेकर, मॅनेजर विजय जगताप, HR विराज जोशी, ऋतुराज पाटील, सचिन भोसले, बाबासाहेब जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.