श्री.दत्तात्रय नामदेव चांगण व सौ.वैशाली दत्तात्रय चांगण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 दैनिक स्थैर्य । दि. १७ मे २०२२ । फलटण । मनुष्यबळ विकास सेवा अकॅडमी च्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण नुकतेच पुणे येथे श्री.प्रकाश सावंत व सौ.मनिषा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी मौजे सासकल येथील सासकल गावचे सुपुत्र, विद्यार्थीप्रिय आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री. दत्तात्रय नामदेव चांगण व सौ.वैशाली दत्तात्रय चांगण यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा आकादमी यांचेकडून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्री दत्तात्रेय नामदेव चांगलं यांनी शाळा सुधार संघटनेच्या मार्फत मौजे सासकल याठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचप्रमाणे कोरोना काळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये उदरनिर्वाह करणार्‍या कुटुंबांना आर्थिक, जीवनावश्यक वस्तू व वैद्यकीय स्वरूपाची मदत केली आहे.

त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मौजे सासकल ग्रामपंचायत, सासकल जन आंदोलन समिती, शाळा सुधार संघटन सासकल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, नेहरू युवा मंडळ आदर्श नगर सासकल, अर्जुन तात्या तरुण मंडळ सासकल, दुर्गादेवी तरुण मंडळ सासकल, यांच्यावतीने त्या दोघा उभयतांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!