
दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा नगरपालिका ही आदर्श नगरपालिका व्हायला हवी . हीच आमची अपेक्षा आहे . आम्ही कामे करतो म्हणूनच नारळ फोडतो तुम्ही समोरासमोर चर्चेला कधीही या मी तयार आहे असे खुले आव्हानं खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंह राजे यांचे नाव न घेता दिले.
सातारा विकास आघाडीच्या महत्वाकांक्षी सातारा पालिकेच्या कॅम्प सदर बझार येथील नूतन इमारतीचे भूमीपूजन खासदार उदयनराजे यांच्या हस्ते गुरुवारी शानदार कार्यक्रमात करण्यात आले.
सातारा विकास आघाडीच्या वतीने प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे दिमाखदार नियोजन करण्यात आले होते . यंदाच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभेची मुदत संपत असताना प्रशासकीय इमारती चा भूमीपूजनं सोहळा घेऊन ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर सातारा विकास आघाडीने आणखी एक मास्टर स्ट्रोक मारला आहे.
यावेळी व्यासपीठावर खासदार उदयनराजे भोसले, अँड दत्ता बनकर, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, निशांत, वसंत लेवे, राजू भोसले, सभागृह नेत्या स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, किशोर शिंदे, सुहास राजेशिर्के माजी शिक्षण सभापती सुनील काटकर इ यावेळी उपस्थित होते.
उदयनराजे पुढे म्हणाले माझ तोंडभरून कौतुक झालं त्याबद्दल मी आभारी आहे. कोण काय म्हणतय याच्याशी मला काहीच घेणं नाही. सातारकरांच्या पाठबळावर मी ठाम असून भविष्यातही मी आपल्या सेवेत रुजू आहे. सातारकर माझं हृदय आहे. त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. मी तुमच्या सर्वांच प्रेम कमाविल आहे ते गमावणार नाही. टीका करणारे करतील पण जे काम करतात तेच नारळं फोडतात. चर्चेला याल तर धाडस ठेवा असे आव्हान त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना दिले. सातारा विकास आघाडीच्या वतीने उदयनराजे यांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमा दरम्यान चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा लाभलेल्या नूतन प्रशासकीय कामाचा शुभारंभ म्हणून उदयनराजे यांनी पहिली कुदळ मारली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी फटाक्यांची एकच आतषबाजी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक निशांत पाटील यांनी करत नूतन इमारतीच्या जागा हस्तांतरणाचा प्रवास थोडक्यात कथन केला. खा. उदयनराजे यांच्या माध्यमातून साताऱ्यात अनेक पायाभूत विकास कामे मार्गी लागत आहेत. पंच्च्याहत्तर कोटीचे अंदाजपत्रक आणि तब्बल पाच मजले आणि ते ही पर्यावरणपूरक या शब्दात निशांत पाटील यांनी नूतन वास्तूचे कौतुक केले. वास्तुविशारद सुहास तळेकर नूतन इमारतीचे तांत्रिक विश्लेषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरिष चिटणीस यांनी केले.